इंदापूरात ऐंशी टक्के मतदारांची पसंती “तुतारी” वाजविणारा माणूस ; इंदापूर शहरात भरत शहा यांचा होम टू होम प्रचार.

विजय शिंदे

शहरातील भगवान महावीर जैन मंदिरात पुष्पहार अर्पण करून शहरात प्रचाराला सुरवात करण्यात आली.बारामती लोकसभेच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ युवक वर्ग सक्रिय झाला असून, इंदापूर शहरातील एक नंबर वार्ड पासून माजी भरत शहा यांनी पदयात्रेला सुरवात केली आहे.शहरातील शेकडो युवक या पदयात्रेत सामील झाले असून इंदापूरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

यावेळी भरत शहा म्हणाले की, लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी अखंड बजावलेली आहे. जनतेचे,नागरिकांचे,महिलांचे युवकांचे वृद्धांचे प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले आहेत.त्यामुळेच सुप्रिया सुळे सामान्य जनतेला आधार वाटतात. म्हणूनच इंदापूर शहरात सर्व घटकातील नागरिक प्रचारात सहभागी होत आहेत.

पदयात्रा शहरातील एकूण सतरा वार्डमध्ये घेवून जाणार आहेत.संबंधित वार्डातील मतदारांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या कामाची माहिती देण्यात येत असून,माहितीचे पत्रक वाटप करण्यात येत आहेत.त्याचबरोबर ईव्हीएम मशीनवर तीन नंबरला, खासदार सुप्रिया सुळे यांचे तुतारी वाजविणारा माणूस चिन्ह आहे. त्यावर मतदान करावे. अशीही माहिती नागरिकांना मतदारांना देण्यात येत आहे.

इंदापूर शहरातील प्रत्येक वार्डात घरोघरी जावून, इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा स्वतः व त्यांचे समर्थक यांनी सक्रियपणे प्रचार यंत्रणा राबविली आहे.तसेच बुथ कमिट्या देखील मजबूत करण्यासाठी काम युद्ध पातळीवर सुरू आहे.यावेळी अनेक
ठिकाणी स्वतः बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे पदयात्रेत सहभागी होत आहेत.ते बोलताना म्हणाले की,इंदापूर तालुक्यात ऐंशी टक्के मतदारांची पसंती तुतारीला असून, ते तुतारीकडे वळाले आहेत.

 घरोघरी प्रचार…

इंदापूर शहरातील सर्वच वार्डात आम्ही सर्व कार्यकर्ते पोहचत आहोत. मतदारांना जागरूक करण्याचे काम सुरु आहे. मोठ्या संख्येने मतदानाला नागरिकांनी यावे यासाठी विनंती केली जात आहे. शहरातील एक नंबर वार्ड मधून पदयात्रेला सुरवात केली असून, शहरातील एकूण सतरा वार्डमध्ये आम्ही घरोघरी जावून खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार आहोत. असे इंदापूर नगरपरिषदेचे माजी उनगराध्यक्ष भरत शहा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here