विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेची तारीख ठरली असून बुधवार १ मे रोजी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या यात्रेत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक भाविक सहभागी होत असतात.
श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रे निमित्त संपूर्ण मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाईने सजवले जाते. यावेळी देवाच्या घोड्याची गावातून हलगी तुतारी व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली जाते. यात्रे दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
यात्रेच्या निमित्ताने यात्रा कमिटीच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.