सर्वच मार्ग खुंटले मग नाईलाजाने त्यांच्यावर ही पाळी..

विजय शिंदे

शरद पवार हे महाराष्ट्राचे आत्मा आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येऊन जेवढे त्यांच्यावर बोलतील तेवढे लोक शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतील असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ ते बावडा या गावी बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले यंदाची लाेकसभा निवडणुक वेगळी आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशात साम दाम दंड भेदाची निती वापरुन सत्तेवर येण्याचे ठरविले आहे. मात्र, त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अडसर आहे.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारांवर टीका करतात. यावेळी पाटील म्हणाले, शरद पवार यांना अपशब्द वापरल्याशिवाय मोदींना बोलता येत नाही. पंडीत नेहरुंपासून अटलबिहारी वाजपेयीपर्यंत भाषणे एकली. पण विरोधकांवर एवढ्या टोकाची टीका होताना आपण प्रथमच पाहत आहे. मोदींनी दहा वर्षात काय केले हे सांगावे, पुढील नियोजनाबाबत चर्चा करावी. मात्र,ते यावर बोलत नाहीत. महाराष्ट्रातील जनता यांच्यावर प्रचंड चिडलेली आहे. कारण त्यांनी मराठी माणसांनी उभा केलेले दोन पक्ष फोडल्याची शिक्षा त्यांना द्यायची असल्याचे पाटील म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या विकासामुळे तुमच्या आमच्या जीवनात बदल झाला. त्यामुळे पवारांनी काय केले हे त्यांनी विचारु नये. अमित शहांनी गुजरातसाठी काय केले हे सांगावे, त्यामुळे देशाच्या ज्ञानात भर पडेल, असा टोला पाटील यांनी शहा यांना लगावला.

यावेळी माळशिरसचे नेते उत्तमराव जानकर, विकास लवांडे, आप्पासाहेब जगदाळे, तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे,इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे, सागर मिसाळ, जयंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सर्वच मार्ग खुंटले मग नाईलाजाने त्यांच्यावर ही पाळी..

विठ्ठल ‘ चे चेअरमन अभिजित पाटील यांना भिती दाखवून त्यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील करून त्यांना अडचणीत आणण्याचे काम या लोकांनी केले आहे. गेले काही महिने त्यांना प्रचंड प्रेशरखाली ठेवण्याचे काम झालेले आहे तरी देखील ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा व धैर्यशील मोहिते- पाटील यांचा प्रचार करीत होते.

आता शेवटी सर्वच मार्ग खुंटले मग नाईलाजाने त्यांच्यावर ही पाळी आलेली आहे.परंतू त्यांचे कार्यकर्ते, सहकारी हे सगळे आमचे काम करीत असून माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील हे प्रचंड मतांनी विजयी होतील याची मला खात्री असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं.

बावडेकरांना काही सांगावं एवढा मोठा मी नाही..

कोण कोणाचा का प्रचार करत आहे.? हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे.कोणाचा नाईलाज झालाय हे तुम्हाला माहिती आहे. ज्यांच्यासोबत आयुष्यभर उभा दावा होता त्यांचाच प्रचार करण्याची वेळ येणे यासारखे आयुष्यात दुसरे काहीच नाही. असे नाव न घेता जयंत पाटील यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली. तोंड दाबून बुक्याचा मार,मनात तर सगळ आहे परंतु वरचा आदेश आहे. वरच्या आवाजाला घाबरणारी महाराष्ट्रात खूप जण निघाली हेच महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणत त्यांनी अजित पवारांसह पक्ष सोडून गेलेला नेत्यांवर टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here