विजय शिंदे
बारामती लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे पुत्र युवा नेते श्रीराज भरणे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातील पश्चिम भागात ‘होम टू होम’ प्रचार केला.
यावेळी भरणे यांनी घरोघरी जाऊन, पत्रके वाटून महायुतीचे उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या वेळी श्रीराज भरणे म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विविध विकास कामे इंदापूर तालुक्यात पार पडली, यामुळे इंदापूरकर सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार विजय झाल्यास केंद्र सरकारच्या अनेक योजना इंदापूर मतदारसंघात राबविल्या जातील.