विजय शिंदे
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुती राष्ट्रवादी (अजित पवार गटाच्या) उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जोरात प्रचार सुरू केला आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासोबतच सोनाई उद्योग समूहाचे संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी स्वत : लक्ष घालून मतदारसंघात गावबैठका, कोपरा सभा आणि नागरिकांच्या गाठीभेटीवर भर दिलाय.
यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले “केंद्रात मोदी सरकारने तर राज्यात महायुतीच्या सरकारने जनतेच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी जोमाने प्रचारकार्य सुरू केले आहे. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या विजयी होतील. असा विश्वास देखील प्रवीण माने यांनी व्यक्त केलाय.