विजय शिंदे
श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय भाटनिमगाव (ता.इंदापूर ) येथे ६४ वा महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष विजय शिंदे यांचे हस्ते झाले. या वेळी सरपंच अजित खबाले, सोसायटीचे माजी चेअरमन नागनाथ खबाले, चंद्रकांत चव्हाण, अमीर सय्यद उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध व प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोचविण्याचा संकल्प करायला हवा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
या वेळी महाराष्ट्र दिनाच्या ६४ व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सहभागी झालेल्या आणि आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.