विजय शिंदे
बारामती लोकसभेतील उमेदवारांच्या प्रचाराणे आता वेग घेतला आहे. कोपरासभा, गांव भेट दौऱ्याबरोबरच अन्य मार्गांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचे दिसते.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारासाठी झगडेवाडी (ता. इंदापूर) येथे माजी सरपंच रूपाली अतुल झगडे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढत गावातील शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.
केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असून आपल्या लोकसभा क्षेत्रात त्याच विचारांचा खासदार असल्यास विकासापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी बोलताना रूपाली झगडे म्हणाल्या आपल्या गावात उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्यामुळे विकास कामे झाली आहेत भविष्यातही सरपंच अतुल झगडे यांच्या नेतृत्वाखाली गावचा सर्वांगीण विकास होणार आहे. यासाठी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभा राहा व येणाऱ्या ७ मे त्यांना मतदान रुपी आशीर्वाद द्या असे आवाहन झगडे यांनी केले. यावेळी महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.