विजय शिंदे
तिकडे मलिदा गँग आहे आणि इकडे जनता आहे. त्यामुळे जनता विरुद्ध नेता अशी लढत होईल. साडेतीन लाख ते चार लाखांच्या मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील.पक्ष चोरीला गेला चिन्ह चोरीला गेले. लोकसभेच्या सहा महिने आधी ती सगळी यंत्रणा चोरीला गेली. ती सगळी यंत्रणा दादा स्वत:साठी वापरत आहेत. ज्या मैदानावर गेली ४० वर्ष सभा होते ते मैदानही चोरीला गेले आहे. आता सगळेच चोरीला जात असले तरी लोकांचा विचार चोरीला जाऊ शकत नाही, तोच विचार आणि तिच ताकद आणि वजय हा तुतारीचा झाल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
त्यांना आवाका माहित असता तर…
रोहित पवार म्हणाले, विचार आणि परंपरा जपण्याची जबाबदारी सगळ्यांची असते. दादा पलीकडे का गेले संपूर्ण दुनियेला माहित आहे. जर दादांना साहेबांचा आवका माहित असेल तर त्यांचा प्रश्न आहे. मात्र, त्यांना आवाका खरचं माहिती असता तर दादांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती. आम्ही का लढतोय हे आम्हाला माहित आहे ते सत्तेसाठी गेले ते त्यांना माहित आहे. ज्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत ते त्याच्यासाठी लढत आहे. आमच्यासाठी विचार महत्त्वाचे आहेत म्हणून आम्ही विचारासाठी लढत आहोत
एवढे बदललेले दादा आम्ही पाहिलेले नाहीत.
इंदापुरात पवारांच्या गाड्या सुसाट..
बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत असल्याने प्रचारासाठी पवारांच्या गाड्या सुसाट सुटल्या आहेत, सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी राजेंद्र पवार,आमदार रोहित पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार,योगेंद्र पवार कार्यकर्त्यांच्या भेटी घेताना दिसून येत आहेत.