विजय शिंदे
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुलेनगर (बिजवडी) व निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर, या दोन्हीं कारखान्यांची गळीत हंगाम सन 2023-24 मधील सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहेत,अशी माहिती कर्मयोगी व निरा भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी दिली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली दोन्ही कारखाने शेतकरी हितासाठी कटिबद्ध आहे. या दोन्हीं कारखान्यांकडून गाळप झालेल्या सर्व उसाची प्रति टन रु. 2700 प्रमाणे सर्व रक्कम व ऊस तोडणी वाहतुकीची सर्व बिले अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग व वाहतूकदारांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आगामी काळ दोन्ही कारखान्यासाठी भरभराटीचा राहणार आहे. या दोन्हीं कारखान्यांचा अडचणीचा काळ संपला असून, आता कारखाने पूर्व पदावर येत आहेत, त्यामुळे कारखाने गतवैभव प्राप्त करतील, असे यावेळी राजवर्धन पाटील यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्व खालील केंद्र सरकारने देशातील साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. सहकार मंत्री अमित शाह यांचे मार्गदर्शनाखाली देशातील सहकार चळवळ मजबूत होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांचे नेतृत्वाखाली राज्य सरकारही साखर उद्योग व शेतकरी हितासाठी सहकार्याची भूमिका घेत आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी देशातील साखर उद्योगापुढील प्रश्न केंद्र सरकारपुढे मांडून ते सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून शेतकरी हिताचे अनेक निर्णय होत आहेत. केंद्र सरकारने देशातील साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांची माहिती हर्षवर्धन पाटील हे भाग्यश्री बंगला इंदापूर येथे शनिवार दि.4 रोजी सकाळी 10 वा. पत्रकार परिषदेमध्ये देणार आहेत, अशी माहितीही यावेळी राजवर्धन पाटील यांनी दिली.
___________________________