महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी समसमान.? बारामती पवारांची पण कोणत्या.?

विजय शिंदे

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप एकीकडे ‘अब की बार ४०० पार’चा नारा देत प्रचाराला लागले होते तर दुसरकीकडे विरोधकांनीही भाजपाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान आता राज्यात तसेच देशात कसे चित्र राहील याचा अंदाज बांधला जात आहे.

त्यात यंदा महाराष्ट्राकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटी नंतर महाराष्ट्रातील निर्णय काय येतो यावर भाजपची सत्तेतील सूत्रे अवलंबून असतील.

सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचा कल महाविकास आघाडीकडे झुकत असल्याचे चित्र आहे. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी प्रत्येकी २४ – २४ जागा घेऊ शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. महाराष्ट्र हा केंद्र सरकारमध्ये कोणाला सत्तेत आणायचे आणि कुणाला नाही याविषयी निर्णायक भूमिका घेऊ शकेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ असून शिवसेना १, भाजप १ तर शरद पवार यांची राष्ट्रवादी दोन जागा राखेल असा अंदाज आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात  सुप्रिया सुळे या सर्वच विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतील असा अंदाज आहे.

 महायुती वरचढ असलेल्या जागा..

धुळे
जळगाव
रावेर
अमरावती
रामटेक
नागपूर
नांदेड
दिंडोरी
पालघर
कल्याण
मुंबई उत्तर
मुंबई उत्तर पूर्व
मुंबई दक्षिण मध्य,
सांगली,
बीड,
पुणे.
जालना
रामटेक
नंदुरबार.
कल्याण
बुलढाणा.

महाविकास आघाडी जिंकू शकेल अशा संभाव्य जागा.

कोल्हापूर
हातकणंगले
रत्नागिरी
माढा
सोलापूर
लातूर
धाराशिव
अहमदनगर
शिरूर
बारामती
शिर्डी
मुंबई दक्षिण
मुंबई मध्य
मुंबई उत्तर पश्चिम.
रायगड
परभणी
भंडारा गोंदिया.
वर्धा.
भिवंडी .
गडचिरोली
यवतमाळ
हिंगोली
ठाणे
सातारा.
अकोला.

संभाजीनगर (एम आय एम)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here