भरणे मामा जरा जपून नाहीतर सगळं काढायला  वेळ लागणार नाही…

विजय शिंदे

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करणाचा आजचा (रविवार) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांनी आज सभांचा धडाका लावला आहे.ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आवाज बसला असताना ही त्यांनी इंदापूरच्या सभेत जोरदार भाषण करताना सत्तेचा माज उतरवायला वेळ लागणार नाही, असा थेट इशाराच दिला.सत्तेचा गैरवापर करून कुणी दमदाटी करत असेल तर जागा दाखवा. सत्तेचा माज काही लोकांना चढलाय. हा माज उतरवायला वेळ लागणार नाही. मी खात्री देतो तुम्हाला या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. जे लोक तुम्हाला दमदाटी करत असतील तर यत्किंचितही चिंता करू नका हा शरद पवार कायम तुमच्या पाठीशी कायम राहिल.’, असे शरद पवारांनी ठणकावून सांगितले.

या तालुक्यात सत्तेचा गैरवापर करत असतील तर त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचे काम एक ते दोन दिवसांत करू शकतो, असा इशारा शरद पवारांनी दिला.

 

दत्तात्रय भरणे यांना इशारा

“इंदापूरमधील काही लोकांची आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना सांगण्यात आले की आम्ही तुमच्या शेतातील पाणी बंद करू. शेतीचे पाणी हे कोणाच्या बापाची इस्टेट नाही. मी त्यांना एवढंच सांगतो मामा जरा जपून. सरळ करायला वेळ लागणार नाही. तुझ्यासाठी काय केले नाही. दुकानात मदत पाहिजे, त्यामध्ये मदत केली. लहान कुटुंबातील लोकांना मदत करणे, पाठिंबा देणे याची गरज असते. ती भूमिका मी घेतली. मात्र, आज त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाही. त्यांचे पाय हवेत आहेत. आज मी एवढे सांगतो की, कोणीही सत्तेचा गैरवापर करत दमदाटी करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवणे हे काम मी एक ते दोन दिवसांत करू शकतो. पण आज त्या रस्त्याने जायचे नाही”, असा इशारा शरद पवार यांनी इंदापूरच्या सभेत बोलताना दिला.

 

परत येणार…

शरद पवार इंदापूरमध्ये सभा घेत होते. शरद पवारांचा आवाज बसला होता. बोलताना त्यांना त्रास होत असल्याचे दिसून येत होते. मात्र, शरद पवारांनी या परिस्थितीतही विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आपले भाषण संपवताना आपला घसा बसला आहे. आपण येथे परत येऊ असा शब्द ही पवारांनी आपल्या भाषणात दिलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here