विजय शिंदे
मतदान हे राष्ट्रीय कार्य आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत आपल्याला हा अधिकार दिला आहे. सध्या उन्हाचा तडाका वाढला असून आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ मतदार व महिला यांची काळजी घेत सकाळ व दुपारच्या नंतर इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी बाहेर पडून मतदान करावं अस आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांनी समोर यावं, प्रशासनाने मोठ्या सुविधा मतदार केंद्रावर उपलब्ध केल्या आहेत, आतापर्यंत झालेल्या दोन टप्प्यातील मतदान प्रक्रियेत टक्केवारी घसरली असून उद्या सात तारखेला घरातून बाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करा. घटनेने दिलेला अधिकार बजावून लोकशाही मजबूत करा. असे आवाहन पाटील यांनी केले.