विजय शिंदे
राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज सकाळी ७ वाजता सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला.
बारामती लोकसभा मतदार संघासाठी आज ७ मे रोजी मतदान प्रक्रिया सुरू असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्ष भाग्यश्री पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या पुणे जिल्हा अध्यक्ष अंकिता पाटील- ठाकरे, निरा भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी बावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा अधिकार बजावला.
यावेळी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन माजी मंत्री पाटील यांनी केले.