विजय शिंदे
आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्वतःच्याच गावात सुप्रिया सुळे यांचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ इंदापूर तालुक्यात व्हायरल होत आहे.
या बाबीचा सविस्तर वृत्तांत असा की आज ७ मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असून सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते मतदारांचे स्वागत करत होते त्यावेळेस आमदार दत्तात्रय भरणे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी आले आणि समोरील सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांकडे असणारी गर्दी पाहता आमदार दत्तात्रय भरणे यांनी शिवीगाळ करत दमदाटी सुरू केली.
या घटनेने इंदापूर तालुक्यात आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रतिमा डागळली असून या घटनेमुळे सुनेत्रा पवार यांच्या मतदानामध्ये काय परिणाम होतो का हे पाहावे लागेल.