राज ठाकरे पुणे येथे हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला;विविध विषयांवर चर्चा!

विजय शिंदे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पुणे येथील निवासस्थानी शनिवारी (दि.11) सकाळी भेट दिली.यावेळी उभयतांमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली.

यावेळी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवा नेते राजवर्धन पाटील तसेच इंदापूर तालुका जिजाऊ महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक तसेच राज्यातील राजकीय परिस्थिती व इतर विविध विषयांवर चर्चा झाली.
_______________________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here