विजय शिंदे
देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. देशभरात एकून ७ टप्प्यामध्ये निवडणुका होत असून महाराष्ट्रात ५ टप्यांत निडणुका होत आहेत. त्यातील चौथा टप्पा १३मे रोजी होत आहे.
या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडवल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू असलेला प्रचार आणि नेत्यांची एकमेकांवरती होत असलेल्या आरोपांच्या फैरी आज थंडावल्या आहेत. शेवटच्या दिवशी पावसाचे वातावरण असताना महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुफान टोलेबाजी केली.
चौथ्या टप्यातील महत्वाच्या लढती.
यामध्ये बीड लोकसभेत स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या भाजप नेत्या पंकजा मुंडे महायुतीकडून आहेत. तर त्यांच्या विरोधात बीड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे मैदानात आहेत. दुसरीकडे मोठा राजकीय वारसा असलेले डॉ. सुजय विखे अहमदनगर दक्षिणमधून महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंकेंनी दंड थोपटले आहेत. तसंच, छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या मैदानात गेली अनेक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून एकत्र असलेले शिलेदार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. येथे महायुतीकडून मंत्री संदिपान भुमरे आहेत तर महाविकास आघाडीकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे आहेत. तर, जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा लोकसभेत गेलेले रावसाहेब दानवे महायुतीकडून सहाव्यांदा मैदानात आहेत. तर शिरुर लोकसभा मतदारसंघही अजित पवार यांनी प्रतिष्ठेचे केला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत. पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी लढत होत आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या शेवटी सभा घेतल्या आहेत. रावेर मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्यात लढत होत आहे. जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध करण पवार यांच्यात लढत होत आहे. जालना मतदारसंघात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेविरुद्ध महाआघाडीचे डॉ. कल्याण अशी लढत होत आहे.
या टप्प्यात महायुतीतील सात जागा या भाजपच्या आहेत. तर तीन जागा या शिंदे सेनेच्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची शिरुर जागा आहे. सात जागेवर भाजपचे खासदार होते. त्यात जळगाव, बीडचे उमेदवार भाजपने बदलून दिले आहेत. पुण्याची जागा गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त होती. नंदुरबारला हिना गावीत, जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अहमदनगरमधून सुजय विखे, रावेरमधून रक्षा खडसे हे विद्यमान खासदार आहेत.
चौथा टप्पा १३ मे राज्यात कुठं-कुठं मतदान होणार
नंदूरबार
जळगाव
रावेर
जालना
छत्रपती
संभाजीनगर
मावळ
पुणे
शिरुर
अहमदनगर
शिर्डी
बीड