विजय शिंदे
मृत्यूनंतर आपल्या कुटुंबातील व्यक्तीची आठवण सदैव अबाधित राहावी पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या ध्यासातून इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी “मायेची” सावली हा उपक्रम राबवत इंदापूर शहरात वृक्षारोपण केले.
गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या सासू सुजाता दत्तात्रय साठे यांचे कोरोनामुळे निधन झाले ते अनपेक्षितच होते, त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून वृक्षारोपण करण्यात आले. ‘झाडे जगली तर माणसे जगतील’ असा संदेश या उपक्रमाद्वारे खुडे कुटुंबीयांनी दिला.