क्षेत्र पंढरपुर येथील विठ्ठल रखुमाईचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू.

विजय शिंदे

श्री क्षेत्र पंढरपुर येथील विठ्ठल रखुमाईचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल रखुमाई मंदिराचे सह अध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलीय.

विठ्ठल रखुमाईच्या मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धारचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या पहाटे ५ ते सकाळी ११ दरम्यान मुखदर्शनासाठी परवानगी देण्यात आले आहे. परंतु आता मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे २ जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे.

मंदिर समितीनं बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सदस्य डॉ. दिनेशकुमार कदम, शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अॅड. माधवी निगडे, ह.भ.प प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प शिवाजीराव मोर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री विठ्ठल रखुमाईच्या गाभाऱ्याच्या संवर्धनाचे काम करण्यात आले होते. या कामा दरम्यान मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी समिती व प्रशासनाने केवळ मुखदर्शनाचा निर्णय घेतला होता. या कामासाठी ४५ दिवसांचा कालावधी अपेक्षित होता. याबद्दल सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, गाभारा संवर्धन आणि जिर्णोद्धार कामाच्या दरम्यान अधिकची कामे असल्याचे निदर्शनाला आले. या कामांसाठी ४५ दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लागला आहे. आता काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे २ जूनपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती औसेकर यांनी दिली.

दरम्यान, भाविकांना आषाढी वारीची ओढ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने आषाढी वारीच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे नियोजन केले आहे. मंदिर समितिने नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here