भीमा नदीच्या पात्रात बोट (लांस )पलटी

विजय शिंदे

भीमा नदीच्या पात्रात सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यात लोकांना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव वरुन इंदापूर तालुक्यातील कळाशी अशी ही वाहतूक केली जाते. आणि हीच बोट (लांस )पलटी झाली असून यामध्ये सहा जण बुडाल्याचे प्राथमिक माहिती आहे.यातून एका जणाने पोहत आपला जीव वाचवला आहे.घटना समजतात बचाव कार्यासाठी महसूल पोलीस प्रशासन पोहचत आहेत. स्थानिक ग्रामस्थ आता मदतीला धावले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे बचावले आहेत. त्यांनी पोहोचत पाण्याबाहेर येऊन ही घटना सांगितली त्यानंतर आता काळाशीतील ग्रामस्थांनी मदतीला धावले आहेत.या बोटीतून ही सर्व मंडळी इंदापूर तालुक्यातील कळाशी येथे कार्यक्रमासाठी येत होती आणि याच दरम्यान या बोटीला अपघात झाला आणि ही बोट वाऱ्यामुळे पाण्यात बुडाली गेली. या बोटीत एकूण सात प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे त्यापैकी राहुल डोंगरे पाण्याबाहेर आले आहेत तर इतरांचा शोध सुरू आहे यामध्ये एक महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here