प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न मात्र अद्याप यश नाही;गुरुवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू होणार.

विजय शिंदे

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भीमा नदी पात्रात मंगळवारी २१ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास प्रवासी वाहतूक करणारी होडी (लॉन्च) ही वादळी वाऱ्याचा फटका बसून भीमा नदी पात्रात बुडाली गेली. यात एकूण सात प्रवासी होते त्यापैकी एक व्यक्ती पोहून पाण्यातून बाहेर आला त्यामुळे त्याचा जीव वाचला इतरांचा मात्र अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही.

ही घटना समजताचं आमदार दत्तात्रय भरणे, बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे घटनास्थळी दाखल झाले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बाहेरगावी असल्याने त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून घटने संदर्भात  माहिती घेतली. मंगळवारी रात्री उशीरा ९ पर्यंत शोधमोहीम सुरु होती. मात्र उडथळे आल्याने ही शोधमोहीम थांबण्यात आली.

बुधवारी सकाळी पुन्हा साडेसात वाजल्यापासून एनडीआरएफ च्या माध्यमातून शोध मोहीम सुरु करण्यात आली. दोन सव्वादोन तासांच्या प्रयत्नानंतर ही यश न आल्याने एनडीआरएफ च्या दोन पाणबुडी उजनी पात्रात सोडण्यात आल्या.पाणबुडी पाण्यात सोडल्यानंतर बुडालेल्या बोटीचा सुगावा लागला.बुडालेली बोट हलवून ही पाहीली मात्र हाती काही लागलं नाही.पाणबुडीच्या मदतीनं केवळं त्या ठिकाणी बोटीतील दुचाकीचा शोध लागला.मात्र बुडालेले ते सहा लोक सापडले नाहीत.

दरम्यान ही घटना समजताचं खा.सुप्रिया सुळे आणि खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही घटनास्थळी भेट दिलीय.झालेल्या घटनेबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केलीय.प्रशानाचे शर्तीचे प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं.

एकंदरीत उजनी पात्रात काल रात्रीपासून त्या सहा जणांचा शोध घेतला जातोय.आज सकाळपासून एनडीआरएफ पथक त्यांचा शोध घेत होतं. पथकाने तब्बल दहा तास हून अधिक काळ शोध मोहीम राबवली मात्र आता शोध कार्यात अडथळा येत असल्यामुळे ही शोध मोहीम थांबवण्यात आली आहे.उद्या सकाळी साडेसात वाजता पुन्हा ही शोध मोहीम सुरू केली जाणार आहे.

घटनास्थळी मंगळावारी रात्रीपासून बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, करमाळा तहसिलदार शिल्पा ठोकडे,करमाळा प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांसह स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ ची टीम दाखल असून या सहा जनांचा शोध लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here