विजय शिंदे
उजनी धरणाच्या बॅक वॉटरला पाण्यामधून प्रवासी घेऊन निघालेली बोट मंगळवारी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे उलटली. या घटनेमुळे जाधव -डोंगरे व अवघडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला यामध्ये लहान मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याने मन हेलावणारी व वेदनादायी घटना घडली. या दुखातून सावरण्याची त्यांना परमेश्वरांनी शक्ती देवो अशी प्रार्थना पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केली.
यावेळी प्रवीण माने म्हणाले ही घटना घडल्याचे समजतात त्या दोन लहान मुलांची माहिती मिळाली त्यावेळी मन गलबलून गेले. हि मनाला सुन्न करणारी घटना आहे.
ही प्रवासी बोट सोलापूर जिल्ह्यातील कुगाव येथून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे निघालेली होती.
या बोटीमध्ये एकूण सात प्रवासी होते. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला त्यापैकी पाच मूर्त देह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.तर, एक जण पोहत नदीच्या किनाऱ्यावर आल्याने वाचला.
दरम्यान बुधवारी सकाळपासूनच ‘एनडीआरएफ’ च्या पथकाने उर्वरित सहा जणांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. गुरुवारी यापैकी ५ मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.