दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (ता. २७) दुपारी ऑनलाइन जाहीर होणार. एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर

विजय शिंदे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. २७) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होईल.

राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची लेखी परीक्षा एक ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात आली. परीक्षेसाठी २३ हजार २७२ शाळांमधून १६ लाख नऊ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात आठ लाख ५९ हजार ४७८ विद्यार्थी, सात लाख ४९ हजार ९११ विद्यार्थिनी आणि ५६ तृतीयपंथी आहेत. पाच हजार ८६ मुख्य केंद्रांवर परीक्षा झाली.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here