विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील शेतकरी कुटुंबातील गायत्री उल्हास भोसले हिने आज जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात ८९.२० टक्के मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
शेतकरी कुटुंबातील गायत्री भोसले ही बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन स्कूल येथे शिक्षण घेत होती. यावेळी बोलताना गायत्री हिने मार्गदर्शक शिक्षक व आई-वडील यांचे आभार मानले.
ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलीने यश संपादन केल्याने भाटनिमगाव येथील ग्रामस्थ व नातेवाईकांनी गायत्रीचे कौतुक केले.