विजय शिंदे
लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर आता इंदापुरातून भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. बारामती लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन कार्यकर्त्यांना काम करण्यास भाग पाडले. आता विधानसभा आमची म्हणत त्यांनी आतापासूनच ही मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
इंदापूर तालुक्यातील जनतेचे प्रश्न जाणून घेवून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भाजप नेते, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.३१) इंदापूरात जनता दरबाराचे आयोजन केले होते यावेळी दरबारात इंदापूर तालुक्यातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला असल्याचे पहायला मिळाले .
इंदापूर येथे भाग्यश्री बंगल्यात सकाळी आठ वाजल्यापासून जनता दरबारास सुरुवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत तालुक्यातील नागरिक प्रश्न सोडवण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेत असल्याचे दिसून आले.