लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुणे जिल्ह्यातील अनेकांचे राजकीय भवितव्यही ही निवडणूक ठरवणार .?

विजय शिंदे

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निकालाला अवघ्या काही तासांचा अवधी राहिल्याने पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार तर शिरूर मतदार संघातून विद्यमान खासदार अमोल कोल्हे, की माजी शिवाजीराव आढळराव पाटील विजयी होणार, याविषयीची उत्सुकता ताणली आहे.

लोकसभेच्या निकालावर जिल्ह्याचे आगामी राजकीय समीकरण निश्‍चित होणार असल्याने या निवडणुकीच्या निकालावर राजकीय क्षेत्रात पैजा लागल्या आहेत. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडी चे उमेदवार विजयी झाले तर विधानसभेला चांगलीच रंगत येणार असून, अनेकांचे राजकीय भवितव्यही ही निवडणूक ठरवणार आहे.

दोन्हीही मतदारसंघांत कोण विजयी होणार, याची चर्चा चांगलीच रंगली. त्यानंतर उमेदवार, त्यांचे समर्थक शांत होते. आता निकालाची तारीख जशी जवळ येईल तशी उमेदवारांसह त्यांच्या मागे ताकद लावलेले नेते, कार्यकर्ते यांची धाकधूक वाढली आहे. पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघ झालेल्या मतदानाची आकडेवारी घेऊन विजयाचा ठोकताळा बांधला जात आहे. आपलाच उमेदवार कसा विजयी होणार याचे आराखडे या आकडेवारीवरून सांगितले जात आहेत. त्यात किती तथ्य आहे, याचा फैसला मंगळवारी (ता. ४) होईलच.

दोन्ही मतदारसंघांतील विजयावर अनेकांच्या पैजा तर लागल्या आहेतच; पण सट्टाबाजारातही कोट्यवधीची उलाढाल झाल्याचे समजते.

मतमोजणी केंद्रावर ‘वॉच’

सात मे रोजी मतदान झाल्यापासून उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी मतमोजणी केंद्राबाहेर २४ तास राबता ठेवला आहे. त्यासाठी काही कार्यकर्त्यांची नियुक्ती केली असून, दर चार तासांनी हे कार्यकर्ते बदलले जातात. याशिवाय दर दोन दिवसांनी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमची तपासणी केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here