महेश भागवत यांची “ट्रक” सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार कोणाचे राजकीय “गणित” बिघडवणार

विजय शिंदे

महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली आहे. कारण गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेल्या पवार कुटुंबातील दोन व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. नणंद-भावजयच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेय. बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार साहेबांसोबत इमोशनली कनेक्टेड आहे तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे . प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता. मतदानाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर असून या लढतीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.

पवार विरुद्ध पवार अशा लढतीत ओबीसी नेते महेश भागवत यांनी मात्र रंगत आणली आहे. मूळचे दौंडचे असलेले भागवत यांची ट्रक इंदापूर दौंड व पुरंदर या तालुक्यांमध्ये जोरात पळाली असल्याची चर्चा आता सुरू आहे. ओबीसी आंदोलनात सक्रिय असलेले महेश भागवत यांची ट्रक सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार कोणाचे राजकीय गणित बिघडवणार हे मात्र उद्या स्पष्ट होणार आहे.

बारामतीमध्ये एकूण 59.50 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानात काहीशी घट झाली आहे. 2019 मध्ये बारामतीत 61.70 टक्के मतदान झाले होते. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढत ही अटीतटीची आहे. त्यामुळे मतदानातील ही साधारण 2 टक्क्यांची घटही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामधील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास खडकवासला आणि पुरंदरमध्ये मतदानाची सर्वाधिक कमी टक्केवारी नोंदवली गेली आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्याने या भागातून सुनेत्रा पवार यांना मोठी लीड मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, खडकवासला मतदारसंघात अवघे 51.55 टक्के मतदान झाले आहे. ही महायुतीच्यादृष्टीने चिंताजनक बाब मानली जात आहे. याशिवाय, सुरुवातीच्या काळात अजित पवार यांना कडवा प्रतिकार करणाऱ्या विजय शिवतारे यांच्या पुरंदरमध्ये अवघे 53.96 टक्के मतदान झाले आहे.

एकूण मतदान – 59.50 टक्के

दौंड – 60.29 टक्के
इंदापूर – 67.12 टक्के
बारामती – 69.48 टक्के
पुरंदर- 53.96 टक्के
भोर – 60.11 टक्के
खडकवासला – 51.55 टक्के

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

दौंड – राहुल कुल
इंदापूर – दत्तात्रय भरणे
बारामती – अजित पवार
पुरंदर- संजय जगताप
भोर – संग्राम थोपटे
खडकवासला – भिमराव तापकीर.

2009 सालचा निवडणूक निकाल –

सुप्रिया सुळे- 4,87,827 मते (विजयी)
कांता नलावडे- 1,50,996 मते (पराभूत)

मताधिक्य – 2 लाख 46 हजार

2014 साली महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यामध्ये जानकर यांचा 69 हजार 666 मताने पराभव झाला होता. 2019 मध्ये भाजपच्या राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी कांचन कुल यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव झाला होता.

2019 चे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान

2019 ला सुप्रिया सुळे 1 लाख 55 हजार मतांनी विजयी झाल्या होत्या, त्यातील 1 लाख 27 हजार 918 मतांचा लीड एकट्या बारामती ने दिला होता. तर इंदापुरने 70 हजार 938 मतांचा लीड दिला होता. या दोन्ही मतदारसंघातून लीड मिळणे तोही एवढा मोठा हे सध्याची परिस्थिती पाहता तरी दुरापास्तच वाटते आहे. गेल्या वेळी सुप्रिया सुळेंना सहापैकी बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर या 4 मतदारसंघात मताधिक्य मिळाले होते. तर भाजपच्या कांचन कुल यांना दौंड मधून 7 हजाराची तर खडकवासल्यातून तब्बल 65 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे बारामतीत मतदान कट टू कट झाले तरी दौंड आणि खडकवासल्यातलं मताधिक्य टिकवले किंवा वाढवले तरी सुनेत्रा पवार यांचा विजय सुकर बनेल असे गणित असू शकते.

दौंडमध्ये महेश भागवत कुणाचं गणित बिघडतात यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पुरंदरमधून गेल्यावेळी सुप्रिया सुळेंना 9 हजाराची आणि थोपटेंच्या भोर मधून 19 हजाराची लीड मिळाली होती, तिथली स्थानिक गणित बघितली तरी यावेळी फार उलटफेर होईल असं वाटत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here