बारामती लोकसभा मतदार संघासाठी पवन कुमार परंकुश यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती.

विजय शिंदे

पुणे, दि. ३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक (काउंटिंग ऑब्झर्व्हर) म्हणून पवन कुमार परंकुश यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

श्री. परंकुश यांच्या निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्र.२०६ असा असून संपर्क क्रमांक ९४९३२६२०७९ असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी गणेश सस्ते हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९८९०९४९५८७ असा आहे, असेही श्रीमती द्विवेदी यांनी कळविले आहे.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here