मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा ; शिक्षकांचे प्रश्न सोडवणार जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांची माहिती.

विजय शिंदे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी नाशिक विभागातील शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या प्रयत्नातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद शिंदे यांना सदर बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.

प्रसाद यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न सदर बैठकीत मांडले आणि मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना संघटनेच्या वतीने नियोजन देण्यात आले निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे की २०११ व ४ जून २०१४ मधील तरतुदीनुसार प्रतिवर्षी विना कट टप्पा वाढ लागू करणे
२) शासननिर्णय १२,१५ व २४ मध्ये नमुद केल्याप्रमाणे ३० च्या आत शासनस्तरावर त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथ, माध्य, उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना समान टप्पावाढ देणे.
३) राज्यातील पुणे स्तरावरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून वेतन अनुदान मंजूर करणे.


शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन अनुदानासाठी ११६० कोटी रूपये मंजूर करत विना वेतन शिक्षकांना वेतन मंजूर करत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
परंतु या निर्णयाला अनुसरूनच आपल्या कार्यकाळात याच शाळांना प्रतिवर्षी विना कट २० टक्के टप्पा वाढ मिळाल्यास या शाळेत अंशतः अनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन त्यांची पूर्ण वेतनाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी तुमच्या अधिन स्तरावर पूर्ण करून यथोचित सन्मान करावा.
याच दरम्यान १२,१५ व २४ या धासननिर्णयान्वये ३० दिवसात शासन स्तरावर त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथ माध्य उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्‌यांना समान टप्पावाढ देणे
आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिले
याप्रसंगी स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे राज्यध्यक्ष के पी पाटील, जिल्हा सचिव समिर पठाण,सुरज घाटविसावे,नियज शेख ,राहूल खैरनार, जयपाल देशमुख, सुभाष पवार, प्रकाश मराठे, सुजाता खट्टे,शेखर बागुल, वैभव सांगळे,राहूल कांबळे, निलेश गांगुर्डे,आदि पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here