देवेंद्र फडणवीस जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार.? नेतृत्वाला विनंती

विजय शिंदे

अठराव्या लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा १ जून रोजी पार पडल्यानंतर मंगळवारी (४ जून) निवडणुकीचे निकाल समोर आले आणि भारतीय जनता पक्षाला तसेच सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला.

राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसले. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली असून त्यांनी सरकारमधून मला वेगळं करावं, अशी नेतृत्वाला विनंती केली आहे.

यावेळी त्यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून पूर्ण वेळ संघटनेसाठी काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. पुन्हा एकदा नव्याने विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार आणण्यासाठी काम करणार असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here