विजय शिंदे
कोण अमोल मेंटकरी.? त्यांना अजून मी भेटलेलो ही नाही. दौंड मधून मी इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील व खडकवासल्यातून भीमराव तापकीर यांनी महायुतीचा धर्म पाळला असून त्याबाबत कोणी आरोप करत असतील तर त्यांना उत्तर देण्याचे काही कारण नाही, आमचा पक्षश्रेष्ठींशी संबंध असून त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचे मत दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी mh twelve सोबत बोलताना व्यक्त केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील मित्र पक्षांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचे काम केले नाही त्यामुळे त्यांचा पराभव झाला असून तो आमच्यासाठी खूप वेदनादायी असल्याचे आमदार अमोल मेटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले होते यावर आमदार राहुल कुल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
यावेळी आ मेटकरी यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल ,आमदार भीमराव तापकीर, विजय शिवतारे यांच्यावर युतीचा धर्म पाळला नसल्याचे गंभीर आरोप केले होते. इंदापूर दौंड पुरंदर खडकवासला मतदारसंघात महायुतीने आमचे काम केले नसल्याचा आरोप त्यांनी या नेत्यांवर केला. दौंड मध्ये गेल्या वेळेस कांचन कुल यांना मताधिक्य मिळाले परंतु आता का मिळाले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर कोणत्याच मतदारसंघात युतीचा धर्म पाळला गेला नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले मी आतापर्यंत विधानसभेची लोकसभेची निवडणूक लढवली आहे माझ्या बाबत बोलताना मिटकरी यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींची परवानगी घेऊन बोलावे. त्यांनी महायुतीकडे तक्रार करावी त्यानंतर मी असेल हर्षवर्धन पाटील भीमराव तापकीर हे पक्षाला उत्तर देतील. उमेदवार म्हणून अजित पवार यांनी विचारले तरी चालेल परंतु यांचा काय संबंध.
मेटकरी यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाचे ही कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना घरच्या बारामतीत का लीड मिळाले नाही? असा प्रश्न आता कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.