विजय शिंदे
लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर इंदापुर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या जनता दरबारानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे या इंदापूर तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
गुरुवार ६ जून रोजी सकाळी ९:०० वाजता भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय इंदापूर येथे त्या नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध राहणार असल्याचे संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.