विजय शिंदे
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे या गुरुवार दिनांक ६ जून रोजी सायंकाळी पाच वाजता शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे उपस्थित राहून मतदार बंधू-भगिनींचे आभार मानणार आहेत.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सुप्रिया सुळे या प्रथमच इंदापूर तालुक्यात येणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इंदापूर तालुक्यातून सुळे यांना २६ हजार मताचे लीड मिळाले आहे.
यावेळी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.