उष्णता, वाढलेले प्रदूषण यावर नियंत्रण राहण्यासाठी झाडे लावा; इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा यांचे नागरिकांना आवाहन.

विजय शिंदे

पर्यावरणा मध्ये झालेला बदल वाढलेली उष्णता, वाढलेले प्रदूषण यावर नियंत्रण राहण्यासाठी व आपल्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज झालेली आहे त्यासाठी झाडे लावून ती जगवली पाहिजेत असे आवाहन इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी केले.


इंदापूर नगरपरिषद व वृक्ष संजीवनी परिवार,इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वसुंधरेच्या संरक्षणाची शपथ घेत शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली तसेच वृक्षारोपण करीत पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमाच्या प्रारंभी नगरपरिषद कार्यालय प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्वांनी वसुंधरेची शपथ घेतली.त्यानंतर शहरातील पुणे सोलापूर महामार्ग,खडकपुरा, नेहरू चौक, कसबा, श्रीराम चौक मार्गे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी तळ इंदापूर येथे आय टी आय परिसरामध्ये आल्यानंतर इंदापूर नगर परिषदेचे सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी व वृक्ष संजीवनी परिवारातील सदस्यांनी प्रामुख्याने देशी वानाची रोपे पिंपळ वड, जांभूळ,चिंच, बहावा व पारिजातक यांचे रोपण केले.

यावेळी इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, अलका ताटे यांच्यासह वृक्ष संजीवनी परिवाराच्या सायरा आतार, प्रभा दाणी,रश्मी निलाखे, अर्चना काळपांडे, अनिता सोनवणे तसेच शहा ग्लोबल ट्रस्टचे विश्वस्त मुकुंद शहा, हमीद आतार, धरमचंद लोढा, प्रा.कृष्णा ताटे, प्रशांत हेळकर, डॉ.ओहोळ, चंद्रकांत देवकर, प्रशांत शिताप, बाळासाहेब क्षीरसागर, वृक्ष संजीवनी मित्र परिवाराचे सर्व सभासद तसेच इंदापूर नगर परिषदेच्या उद्यान, आरोग्य व पाणीपुरवठा विभाग प्रमुख रश्मी बारस्कर आणि नगरपरिषद सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here