विजय शिंदे
खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना खुलं चॅलेंज दिलं आहे. अजित पवार यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक लढविणार असण्याच जाहीर केलं. कारखाना लढवायचा, जिंकायचा आणि रुळावर आणायचा असे निर्धार त्यांनी भरसमभेत कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत अनेक लढती महत्वाच्या होत्या. या निवडणुकीत केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीच्या निवडणुकीकडे लागलं होतं शरद पवार यांची कन्या , खासदा सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या दोघीही बारामतीमधून एकमेकींच्या समोर उभ्या होत्या. अखेर या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.
लोकांना व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवले तरी अडचणी येत होत्या…
एकाच माणसाला बारामती मतदारसंघ माहीत होतं त्यांचे नाव शरद पवार. श्रीनिवास दादा आणि आम्ही अनेक ठिकाणी गेलो आणि लोकांनी दरवाजे बंद केले, कारण लोकांना अडचणी व दहशत होती, परंतु त्यालाच लोकांनी मतदानातून उत्तर दिलंय. शरद पवार आणि आमच्यासाठी लोकांनी त्रास सहन केला. लोकांना व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवले तरी अडचणी येत होत्या. पण असो, झालं गेलं गंगेला मिळालं, आता लोकांना मदत करायची आहे. कोणत्याही माणसाला अडचण येऊ देणार नाही आणि वीज ,पाणी मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीवरून त्रास झाला तर सुप्रिया सुळे ढाल बनवून उभी राहील , असे आश्वासन त्यांनी दिलं.