विजय शिंदे
शहा ता. इंदापूर येथे कृषि विभागामार्फत खरीप हंगामातील प्रमुख पिकाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी कृषि विभागामार्फत खरीप हंगामात राबविण्यात येत असलेल्या विविध बीजप्रक्रिया, बियाणे उगवणक्षमता तपासणी प्रात्यक्षिक, हुमणी नियंत्रण प्रकाश सापळा प्रात्यक्षिक, बीबीएफ पेरणी तंत्रज्ञान, सुपरकेन नर्सरी तंञज्ञान, फळबाग लागवडीकरता सीआरए तंत्रज्ञान याविषयी मंडळ कृषि अधिकारी इंदापूर संजय कदम यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामातील ऊस व मका या पिकांचे लागवड तंञज्ञान याबाबत कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब यादव यांनी मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक भारत बोंगाणे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शेततळे, ठिबकसिंचन, पी.एम.एफ.एम.ई., महाडीबीटी अंतर्गत विविध योजना इत्यादी योजनांविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले.
यावेळी कृषी सहाय्यक गणेश भोंग, वैभव अभंग,शहा गावचे उपसरपंच दिलीप पाटील, विष्णू पाटील, महादेव लांडगे, दादा माने, तानाजी इजगुडे, विजय पाटील,अमोल इजगुडे, सौरभ बनसोडे, रवी देवकाते दादा गलांडे विठ्ठल शिंदे उमेश पाटील राजेंद्र येळे, दादा भोई अमोल इसगुडे माणिक कडवळे,शिवाजी गंगावणे यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.