विजय शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्यास इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी केले ते आज इंदापूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी बोलतात तेजसिंह पाटील म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आणि विजय उत्सव सोहळा दि. १० जून रोजी सायंकाळी ४ वाजता अहमदनगर येथे होणार आहे. या सोहळ्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब मार्गदर्शन करणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पहिली जाहीर सभा अहमदनगर येथे होत आहे. या सोहळ्यास नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान होणार असून बारामती लोकसभेच्या खासदार संसदरत्न सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन यावेळी होणार आहे. या कार्यक्रमास राज्यातील विविध भागातील मान्यवर उपस्थित राहणार असून इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन तेजसिंह पाटील यांनी केले आहे.