विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीत एनडीएने २९३ जागा जिकंत तिसऱ्यांदा बहुमत मिळवले. त्यानंतर रविवारी (दि.९) नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा पार पडला.
पंतप्रधान मोदी याच्या तिसऱ्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनाच्या सचिवालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार नितीन गडकरी यांच्याकडे सलग तिसऱ्यांदा रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने संरक्षण, परराष्ट्र, शिक्षण आणि आरोग्य ही महत्त्वाची मंत्रालयेही स्वत:कडे ठेवली आहेत.
कोणाला कोणते खाते
यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक मंत्रीपद कायम ठेवण्यात येणार असून अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रालय व सहकार खातं कायम ठेवण्यात आले आहे. तसेच अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा यांना रस्ते विकास राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे. तसेच आश्विन वैष्णव यांना रेल्वेमंत्रीपद देण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांना पुन्हा संरक्षणमंत्रीपद देण्यात आले आहे. तसेच एस . जयशंकर यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आले आहे. जे. पी नड्डा याच्याकडे आरोग्य मंत्रालय हे खातं असणार आहे. नितीन कुमार स्वामी याच्याकडे अवजड उद्योग मंत्रालय हे खाते देण्यात आले आहे. रक्षा खडसे यांच्याकडे युवक , कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री खाते असणार आहे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे हवाई वाहतूक राज्यमंत्री खातं देण्यात आलं आहे. प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आले आहे.
महाराष्टातील मंत्र्यांना कोणती खाती?
नितीन गडकरी – रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय
पियुष गोयल – वाणिज्य मंत्रालय
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
प्रतापराव जाधव – आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री