विजय शिंदे
देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार आज बुधवार (१२) रोजी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती येत असून या वेळी ते टंचाई आणि दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
इंदापूर तालुक्यात निरा नदीच्या खोऱ्यामध्ये नीरवांगी, खोराची, बोराटवाडी भीषण पाणीटंचाई चालू असून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पाणीटंचाईच्या आणि दुष्काळाचे चटके बसत आहेत. उद्या तारीख 12 जून 2024 रोजी दुपारी तीन वाजता निर्वांगी येथून पाणी दौरा सुरू होईल ..
या. टंचाई बाबत राज्य सरकार जिल्हा परिषद पंचायत समिती यांना वेळोवेळी सूचना देऊन ही योग्य ती कार्यवाही होत नाही, आणि या टंचाईग्रस्त गावांच्या पाण्याच्या टंचाई बाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे हे गाव टंचाईग्रस्त असतात. ही बाब देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यातील या गावांचा पाहणी दौरा जाहीर केला.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार हे लगेचच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची आणि वचनांची पूर्तता करणार असल्याचे दिसत आहे. शरद पवार यांचा हा दौरा इंदापूर तालुक्यासाठी फलदायी ठरणार असून, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.