सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी निश्चित; आज रात्री नावाची घोषणा होण्याची शक्यता.

विजय शिंदे

बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची लवकरच राज्यसभा नियुक्ती केली जाणार आहे.लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना विजय करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण ताकद लावली परंतु त्या ठिकाणी अपयश आले.

राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच महायुतीमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी कामाला लावले होते. मागील लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या संखेत राष्ट्रवादी काँग्रेसची मते मिळवल्यास सुनेत्रा यांचा विजय सहज होईल अशी अटकळ बांधण्यात आली होती.

लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे हर्षवर्धन पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्याशीही अजित पवार यांनी जुळवून घेतले होते. अशा परिस्थितीतही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी राजकीय टक्कर घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरची नियुक्ती मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here