मला सरकार बदलायचे आहे पाच ते सहा महिने वेळ द्या..

विजय शिंदे

मला सरकार बदलायचे आहे पाच ते सहा महिने वेळ द्या असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (एस पी) अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. आज इंदापूर जिल्हा पुणे येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार इंदापूर येथे आले होते यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडताना दूध दरवाढ तसेच दूध अनुदान याविषयी अनुदान मिळाले नसल्याची तक्रार शरद पवार यांच्याकडे केली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले दूध दरवाढी संदर्भात सरकारकडे आपल्याला म्हणणे मांडावे लागेल पाच रुपये अनुदान हे लिटर मागे आपल्याला मिळाले पाहिजे जर आपली मागणी मान्य करत नसतील तर आपल्याला रस्त्यावर यावे लागेल ते केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे पवार म्हणाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले दुधाच्या धंद्यावर शेतकऱ्यांचा प्रपंच चालतो. सरकार घालवायला वेळ लागणार नाही परंतु मला पाच सहा महिने वेळ द्या मला सरकार घालवायचे आहे असे ते म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here