भाजप कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवावा – हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद.

विजय शिंदे

सर्वसामान्य जनतेला नेहमीच मदत करण्याची भूमिका ठेवा, त्यांच्या सुखदुखात सहभागी व्हा, नवीन मतदारांच्या नोंदणीकडे लक्ष द्या. तसेच सतत इतरांना मान-सन्मान द्या त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांनी जनतेशी असलेला संपर्क वाढवावा, असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील गुरुवारी केले.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांशी इंदापूर येथे संवाद साधला. देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजपची मजबूत सत्ता आली आहे, त्याबद्दल यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नरेंद्रजी मोदी सरकारचे अभिनंदन केले.
ते पुढे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीला वेगळे संदर्भ असतात. मतदारांचा अभ्यास करा व मानसिकता लक्षात घ्या. लवकरच गावोगावच्या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी प्रास्ताविक केले तर आभार शहराध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी मानले.
____________________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here