विजय शिंदे
शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान वनगळी, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर व श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी इंदापूर येथील श्री. वाघ पॅलेस इंदापूर येथे दुपारी 1 वाजता हर्षवर्धन पाटील अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ दिल्ली यांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि 100% निकाल लागलेल्या शाळांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील – ठाकरे तसेच माजी शिक्षणाधिकारी साहित्यिक समुपदेशक अनिल गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या सचिव भाग्यश्री हर्षवर्धन पाटील , इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड. मनोहर चौधरी तसेच श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सचिव किरण पाटील यांनी केले आहे.