विजय शिंदे
पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. वारकरी शिष्टमंडळाला आज शिंदे यांनी हे आश्वासन दिले.आषाढी वारीच्या नियोजनासाठी विशेष बैठकीचे आयोजन आज सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले होते. या बैठकीत वारीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले.
गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी वारी ‘स्वच्छ वारी निर्मल वारी’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याबरोबरच प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला सहा प्रमुख दिंड्यांचे प्रतिनिधी, फडांचे प्रमुख, वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर, पंढरपूर संस्थानचे गहिनीमहाराज औसेकर, तसेच राज्य प्रशासनातील सर्व संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.