विजय शिंदे
पाथरी विधानसभा मतदार संघाचे आमदार व माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वडपूडकर यांनी इंदापूर येथील अतुल कृषी सेवा केंद्र व पार्वती गारमेंट्स उद्योग समूहाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी पाटील उद्योग समूहाचे दिलीप पाटील, विष्णू पाटील, विजय पाटील व पाटील बंधूंनी यावेळी आमदार महोदय यांचे स्वागत केले.
यावेळी सुरेश वडपुडकर यांनी पाटील उद्योग समूहाचे कौतुक केले. कृषी सोबतच कापड व्यवसायातील पाटील बंधूंनी मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे मत माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वडपूरकर यांनी व्यक्त केले.