विजय शिंदे
इंदापूर येथील वृक्ष संजीवनी परिवाराच्या वतीने ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद निमित्त शहरातील दर्गा मज्जित चौकातील दफनभूमी परिसरात वृक्षारोपण करत झाडे लावा झाडे जगवा चा संदेश देत अनोख्या पद्धतीने ईद साजरी करण्यात आली. वृक्ष संजीवनी परिवाराच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे तो राखण्यासाठी इंदापूरच्या वृक्ष संजीवनी परिवाराच्या वतीने “झाडांची भिशी” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष संजीवनी परिवाराच्या वतीने विविध सण उत्सव जयंती पुण्यतिथी यानिमित्ताने झाडे लावीत झाडे वाढवण्याचा संकल्प केला जात आहे.
हाच संकल्प समोर ठेवत ईद-उल-अजहा बकरी ईद निमित्त मुस्लीम दफन भुमी येथे वृक्षारोपन करून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी संपूर्ण परिसरातील कबरीवर फूले वाहून आदरांजली वाहुन वृक्षारोपण करणेत आले.यावेळी इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, वृक्ष संजीवनी परिवाराच्या संयोजिका सायरा आतार, जयश्री खबाले, माधुरी मंदरे, निलोफर पठाण, प्रशांत सिताप, चंद्रकांत देवकर, हमीद आतार, ज्ञानदेव डोंगरे, हाजी सलिमभाई बागवान, अरिफ जमादार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान वृक्ष संजीवनी परिवाराच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वाढत चाललेले उष्णतेचे प्रमाण रोखण्यासाठी झाडे लावणे आवश्यक..
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अनमोल आहे वृक्षांची संख्या कमी झाल्याने वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे ते रोखायचं असेल तर झाडे लावून त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे यासाठीच वृक्ष संजीवनी परिवाराने हाती घेतलेला झाडांची भिशी हा उपक्रम स्तुत्य असून या माध्यमातून अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यासाठी प्रयत्नशील राहू..
अंकिता शहा (माजी नगराध्यक्षा इंदापूर)