भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ एप्रिल १९३७ रोजी उद्घाटन केलेल्या विहिरीच्या सुशोभिकरणाच्या कामाचा आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुभारंभ…

विजय शिंदे

सोलापूर जिल्ह्यात ऐतिहासिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व प्राप्त असलेल्या वळसंग गावातील विहिर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या विकासकामाचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

दलित बांधवांनी स्वातंत्र्यपूर्व काळात वळसंग गावातील या विहिरीचे स्वतः खोदकाम केले होते. वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतरच या विहिरीचे पाणी प्यायचे असा निर्धार देखील त्यांनी केला होता. या नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २४ एप्रिल १९३७ रोजी या विहिरीचे उद्घाटन केले होते. अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे आपल्या सगळ्यांचेच कर्तव्य आहे असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

यावेळी माजी पालकमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी गट नेते संयोजक श्री. आनंद चंदनशिवे, जीएम ग्रुपचे संस्थापक श्री. बाळासाहेब वाघमारे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्री. संतोष पवार, श्री. जुबेर बागवान, माजी नगरसेवक श्री. गणेश पुजारी, जिल्हापरिषद कार्यकारी अभियंता श्री. नरेंद्र खराडे, द. सोलापूर उपाभियंता उषा बिडला, शाखा अभियंता श्री. राजेश जगताप, कनिस्ट अभियंता श्री. सज्जन भडकवाड, सरपंच श्री. जगदीश अंटद, उपसरपंच श्री. कुरेशी, श्री. रवीबॉस कोळेकर, सह संयोजक अनुसीचीत जाती जिल्हा सरचिटणीस श्री. बलवान गोतसुर्वे, श्री. सिद्धराम वाघमारे, श्री. शांतिकुमार गायकवाड, श्री. अक्षय गायकवाड, श्री. रवी गायकवाड, श्री. दीपक गायकवाड, श्री. अशोक गायकवाड यांच्यासह प्रभागातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व भीम अनुयायी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here