चिखली येथे कृषी अभ्यासासाठी विद्यार्थी दाखल..!!

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यातील चिखली येथे शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती येथील कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी या परिसरात शेती अभ्यासासाठी दाखल झाले आहेत.

चिखली (ता. इंदापूर) परिसरात कृषी अभ्यासाकरीता आलेल्या विद्यार्थांमध्ये कृषिदूत आर्यन गायकवाड,आदित्य नाझीरकर, सुदर्शन करळे, ओंकार मेनकर, आर्यन लाळगे,यशोधन खटके, निखिल गायकवाड व ओंकार बंडगर हे सर्व कृषी दुत विद्यार्थी चिखली येथे १० आठवडे वास्तव करणार आहेत.

यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना व नागरिकांना शेती पद्धती व पिक प्रात्यक्षिकाची माहिती, शेतकऱ्यांना वित्तीय पुरवठा करणाऱ्या सोसायटीचे कार्य कशा पद्धतीने चालते ? त्यात कर्जवाटप वसुली व अन्य कामकाजाची माहिती समजुन घेतील. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, व शेतकरी यांनी कृषी दुतांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here