विधान परिषद निवडणूक ; उमेदवार ठरवताना अजित पवारांची डोकेदुखी वाढणार इंदापुरातूनही “हा” बडा नेता इच्छुक.

विजय शिंदे

विधानसभेतून निवडून द्यायच्या विधान परिषदेतील ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होत आहे. भाजपचे ४, काँग्रेसचे २, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा १, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा १, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा १, राष्ट्रीय समाज पक्षाचा १ आणि शेतकरी कामगार पक्षाचा १ अशा ११ आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होत आहे.

विधान परिषदेसाठी येत्या १२ जुलैला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर हे इच्छुक आहेत. उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असून, समर्थकांना शिफारस पत्र गोळा करण्यास सांगितल्याची खात्रीलायक माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवार यांची साथ देत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांना केलेल्या विरोधाची तसेच पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यात यशस्वी ठरलेले प्रदीप गारटकर यांना निष्ठेचे फळ आता मिळणार का ? असा प्रश्न इंदापूरकरांना पडला आहे.

 कोण आहेत प्रदीप गारटकर.?

प्रदीप गारटकर यांची राजकीय कारकीर्द पतित पावन संघटना पासून सुरू झाली विद्यार्थी दशेत असताना अनेक चळवळीत त्यांनी सहभाग नोंदवला सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी इंदापूर शहरात व ग्रामीण भागात युवकांचे संघटन मजबूत केले. विधानसभेच्या सलग तीन निवडणुका लढवत त्यांनी माजी मंत्री व तत्कालीन काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्ह्यात संघटन मजबूत केले. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विधानसभा  निवडणुकीत गारटकर यांची साथ लाभली.

विधान परिषद निवडणूक… मतांचा कोटा किती?

महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या २८८ आहे. पण, काही आमदारांचे निधन झाले आहे. काही आमदार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. या कारणांमुळे विधानसभेतील सध्याची सदस्यसंख्या ही २७४ इतकी आहे.

विधान परिषद निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या २३ मतांचा कोटा असणार आहे.

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना-पवारांची राष्ट्रवादी; कुणाची ताकद किती?

आमदारांचे संख्याबळ लक्षात घेतले, तर भाजप आणि छोटे पक्ष मिळून पाच आमदार निवडून येऊ शकतात. शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात.

काँग्रेसचे संख्याबळ ३६ आहे. त्यामुळे त्यांचा एक उमेदवार सहज जिंकून येईल आणि जास्तीचे मतेही असतील. काँग्रेसने दुसरा उमेदवार दिल्यास त्यांना समविचार छोट्या पक्षांची आणि अपक्ष आमदारांची मदत घ्यावी लागेल.

दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना आणि शऱद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपने सहावा उमेदवार उतरवल्यास आमदारांच्या मतांची फाटाफूट होऊ शकते. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अपक्ष इतर आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे निवडणूक झाल्यास मोठ्या राजकीय घडामोडी घडतील.

क्रॉस व्होटिंगचा जास्त धोका, कारण…

नुकतीच लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत महाराष्ट्रातील निकाल वेगळा लागला. महायुतीच्या विरोधात लोकांनी कौल दिला. त्यामुळे अशी चर्चा आहे की, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here