“हरित गाव” संकल्पना काळाची गरज बनलीय – श्रीराज भरणे 

विजय शिंदे

मानवी जिवन समृद्ध करण्यासाठी माणसाने निसर्गाचा येथेच्छ दुरपयोग केल्यामुळे आज निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला असुन याचा विपरीत परिणाम येणाऱ्या काळामध्ये मानवी जिवनावर होणार आहे.त्यामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची असुन त्यामुळेच हरित गाव संकल्पना ही काळाची गरज बनली असल्याची माहिती युवा नेते श्रीराज भरणे यांनी दिली.


आज वटपौर्णिमेचे औचित्य साधुन भरणेवाडी येथे भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादीचे युवा नेते श्रीराज भरणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की,मानवाच्या अमर्याद हस्तक्षेपामुळे निसर्गचक्र पुर्णत: बदलले असुन पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे त्यामुळे संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीने एकूणच मानवी जीवनाला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी वेळीच काही ठोस पावले उचलणे क्रमप्राप्त झाले असून निसर्गाचा समतोल साधण्यासाठी प्रत्येकाने आपापल्याध्ये गावामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळेच आम्ही अंथुर्णे – भरणेवाडी परिसरात वड,पिंपळ,कडुनिंब,आंबा आदी झाडे लावून आमचा गाव, हरित गाव करण्याचा संकल्प केला असल्याचे श्रीराज भरणे यांनी सांगितले.तसेच प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेऊन आपल्या घरापुढे किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन ही त्यांनी उपस्थितांना केले.या प्रसंगी भरणेवाडीचे सरपंच दिपक भरणे,युवराज म्हस्के,ॲड.किरण धापटे,प्रमोद भरणे,रमेश पोरे,ऊमाकांत धापटे,प्रणित भरणे,सौरभ पोरे,सनी भरणे,अनिकेत साबळे,साहील साबळे,दादा गायकवाड यांच्यासह भरवानराव भरणे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here