विजय शिंदे
महायुती सरकारमध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना इंदापूर तालुक्यातील मित्र पक्षाचे काही पदाधिकारी राजकीय व जाहीर मेळावे व सभांमधून माझ्यावरती अतिशय खालच्या पातळीवर एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत, त्याचबरोबर तालुक्यात फिरु न देण्याची धमकी देत आहेत ,त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत असून सदरील बाब गंभीर असून आपण यामध्ये तत्काळ लक्ष घालावे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालावा आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य ते कारवाईच्या आदेश देऊन सहकार्य करावे असे पत्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
इंदापूर तालुक्यात काही दिवसापूर्वी एका जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती तसेच तालुक्यात न फिरवून देण्याचा इशारा दिला होता यावर माजी मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पत्र देऊन सुरक्षितेची सुरक्षित मागणी केली आहे
देशभरात लोकसभेचे वातावरण तापू लागले असताना इंदापुरात मात्र मित्र पक्षातील संघर्ष पेटताना दिसून येत असून यांचा लोकसभेत सुप्रिया सुळे यांना फायदा होण्याची शक्यता आहे.